Breaking News
Home / महाराष्ट्र

महाराष्ट्र

सगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे ? शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त

मुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची पद्धत आहे. सरकारच्या या जुमलेबाजीविरोधात आधी शेतकऱ्यांनी आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बंड केले. हे लोकप्रियतेचे लक्षण आहे का, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय असल्याचे शिवसेनेने …

Read More »

शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आलं आहे. मराठा समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे …

Read More »

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. मात्र त्याआधीच समन्वयकांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यामुळे दुसऱ्या गटानं जिल्हाधिकाऱ्यात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. …

Read More »

कौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर

मुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला दोष देत एखादीनं नाद सोडून दिला असता आणि दुसरा फोन घेतला असता. परंतु मोबाईलचा नाद सोडून न देता या शिक्षिका असलेल्या या तरूणीनं एखाद्या डिटेक्टिव्हच्या चिकाटीनं व गुगलच्या सेवांचा लाभ घेत मोबाईलचोराला पकडलं. बहाद्दर मुली …

Read More »

मराठा मोर्चातच जमलं वऱ्हाड, आंदोलना च्या स्थळीच लागलं लग्न !

अकोला : संपूर्ण महाराष्ट्रात आज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं बंद पुकारला आहे. अकोला जिल्ह्यातही आज सकाळपासूनच या बंदचा परिणाम दिसून येतोय. घोषणा, आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणच्या तोडफोडीच्या घटनांनी राज्यभरात या बंदची विविध रुपं पाहायला मिळाली. मात्र, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये या आंदोलनाचं एक वेगळंच रुप पहायला मिळालं. मराठा समाजाच्या मागण्या …

Read More »

ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य

यवतमाळ : मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक रस्ते आंदोलकांनी अडवले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक रस्ते आणि महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मात्र यवतमाळमधील एका रस्त्यावर थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता आंदोलकांनी रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. …

Read More »

आता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन

मुंबई : सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची …

Read More »

कोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) …

Read More »

सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं

मुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना …

Read More »

VIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई : किकी चॅलेंजचे जीवघेणे वेडं दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ ३० जुलै रोजी यु ट्यूबवर डाउनलोड करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या …

Read More »