Breaking News
Home / ठळक बातम्या / VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…

VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…

पिसीएमसी न्यूज –  लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी ही घोषणा केली.

‘राज्यातलं राजकारण बदलण्याची गरज आहे. तामिळनाडूतील राजकारण खूपच वाईट झालं आहे. लोकशाही मरणपंथाला लागली आहे. गेल्या वर्षभरात तामिळनाडूच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे राज्य बदनाम झालं आहे. इथे असलेला पारदर्शकतेचा अभाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करु’ अशा भावना रजनीकांत यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

रजनीकांत यांच्या स्टाईलची फक्त दाक्षिणात्यच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांवर मोहिनी आहे. त्यांना असलेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचा राजकीय क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रजनीकांत यांनी नव्या पक्षाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.

याआधी रजनीकांत भाजप नेत्यांच्या अधिक जवळचे समजले जात होते, लोकसभा निवडणुकी वेळी नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांच्या भेटी मुळे राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं. यावेळी भाजपने रजनीकांत यांना पक्षात प्रवेश करण्याचं अनेकदा निमंत्रणही दिलं गेलं होतं. परंतु यावर त्यांनी आत्ता पर्यंत कुठलंही उत्तर दिलं नव्हतं. रजनीकांत आणि जयललिता यांचे जवळचे संबध होते, जयललिता यांचं तामिळनाडूच्या राजकारणात एक वेगळं वजन होतं, हे सांगायची गरज नाही. जयललिता यांच्या मृत्यू मुळे रजनीकांत यांना आता राजकीय शत्रू निर्माण होण्याची भीती संपली आहे.

तामिळनाडू मध्ये करुणानिधी, जयललिता यासारख्या अनेकांनी अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. रजनीकांत ही परंपरा कशी सुरु ठेवतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …