Breaking News
Home / ठळक बातम्या / भाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल

भाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल

पिसीएमसी न्यूज –  भाजपमधील किरकिरीचा पाटीदार नेता हार्दिक पटेल फायदा घेऊ इच्चीतो आहे. भाजपमध्ये नितीन पटेल यांचा सन्‍मान होत नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे पाटीदार नेते हार्दिक पटेल याने म्‍हटले आहे. गुजरातमध्‍ये मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्‍यातील आंतरिक वादानंतर हार्दिक यांनी नितीन पटेल यांना काँग्रेसमध्‍ये येण्‍याची ऑफर दिली आहे. नितीन पटेल हे भाजपचे १० आमदार काँग्रेसमध्‍ये आणतील तर काँग्रेसमध्‍ये त्‍यांना हवे ते पद मिळण्‍यासाठी चर्चा करू, असे अश्वासनही त्याने दिले आहे.

हार्दिक बोटाडमध्‍ये आयोजित पाटीदार अनामत आंदोलन समितीच्‍या बैठकीपूर्वी तो बोलत होता.  दरम्‍यान, गुजरातच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्‍यानंतर रुपाणी सरकारच्‍या मंत्रिमंडळास खाते वाटप करण्‍यात आले. यावेळी मुख्‍यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्‍यमंत्री नितीन पटेल यांच्‍यामधील आंतरिक वादाचा मुद्‍दा चर्चेत आला. खाते वाटपावेळी नितीन पटेल तसेच तेथील आमदारांनीही नाराजी दर्शवली. भाजपच्‍या या दोन नेत्‍यांमधील वाद हा खाते वाटपावरुनच झाल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले.

मुख्‍यमंत्री रुपाणी, उपमुख्‍यमंत्री नितीन पटेल आणि भाजप अध्‍यक्ष जीतू वघानी यांची वाद मिटवण्‍यासाठी मुख्‍यमंत्री यांच्‍या निवासस्‍थानी गुरुवारी बैठक झाली. यामुळे मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत नवनिर्वाचित मंत्र्यांना जवळजवळ चार तासांची प्रतीक्षा करावी लागली.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, नितीन पटेल यांनी खाते वाटपानंतर नाराजी दर्शवली. त्‍यांना महसूल, अर्थ खात्‍याची जबाबदारी हवी होती. मात्र, त्‍यांना हे खाते मिळाले नाही शिवाय, वडोदराचे आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांनीही विरोध करत रोष व्‍यक्‍त केला. वडोदरातून एकादेखील आमदाराचा समावेश मंत्रीमंडळात न केल्‍याने त्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केली

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …