Breaking News
Home / ठळक बातम्या / ‘त्या’ दोघांनी अनेकांचे प्राण वाचवले, समोरच्या ‘मोजो पब’ मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता

‘त्या’ दोघांनी अनेकांचे प्राण वाचवले, समोरच्या ‘मोजो पब’ मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता

पिसीएमसी न्यूज – कमला विहारमध्ये आगीचे लोळ सर्वत्र पसरलेले, समोरच्या ‘मोजो पब’मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता. ‘वन अबाव्ह’मधली गर्दी माझ्या पीसीआर रूम जवळ आली. बचाव.., आग लगी है.., बाहर कैसे निकलना है.. या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मी बाहेर पडणार इतक्यात लाईट गेली. अंधार झाला. काही दिसत नव्हते. गच्चीतील पीसीआर रूममध्ये एक वर्ष काम केल्याने मागच्या बाजूला एक दरवाजा आहे हे मला माहीत होते.

सर्वाना मी तिथून बाहेर पडण्यास सांगितले. मात्र तो दरवाजा बाहेरून बंद होता. मी संरक्षक भिंतीवरून कसाबसा तिथे पोहोचलो आणि लाथा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला आणि जेमतेम दिड फुटांच्या अरूंद गल्लीत अडकून पडलेले सुमारे दिडशे जण तेथून बाहेर पडले. आतल्या बाजुला आणखी काही लोक अडकून पडल्याची माहिती मिळाली. मी पुन्हा आत गेलो. पण आगीने ‘वन अबाव्ह’ला कवेत घेतले होते. मुख्य दरवाजापाशी आगीचे तांडव सुरू होते..महेश साबळे सांगत होता.

महेशने सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरज गिरी या मित्रासोबत आगीत अडकून पडलेल्या तब्बल दीडशे जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढले. इतकेच नव्हे तर गच्चीतून तळमजल्यावर उतरणाऱ्या जीन्यात येतील तितके दरवाजे तोडून या दोघांनी एकवटलेल्या धूराला वाट मोकळी करून दिली.

अग्निशमन दलाला फोन करून बोलावले. कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीत राष्ट्रीय वृत्त वाहिनीचे कार्यालय आहे. महेश या वृत्त वाहिनीच्या तांत्रिक विभागात काम करतो. तर गिरी खासगी सुरक्षा रक्षक आहे. आग लागल्याचे कळताच महेशने इमारती खाली कर्तव्य बजावणाऱ्या गिरीशी संपर्क साधून बचाव कार्य हाती घेतले.

इमारतीच्या गच्चीत ‘वन अबाव्ह’ रेस्टॉरेन्ट आणि ‘मोजो पब’ आहे. या आस्थापनांच्या मागील भागात महेश काम करत असलेला पीसीआर रूम आहे. या खोलीच्या शेजारील दिड फुटांची अरूंद गल्ली मागील दरवाजाकडे जाते. तर पुढे कमला हाऊसच्या कार्यालयातून ही गल्ली या दोन आस्थापनांपर्यंत जाते. या गल्लीच्या मागच्या तोंडाला असलेला दरवाजा बाहेरून बंद होता. तो महेशने तोडला आणि खोळंबलेल्या ग्राहकांना बाहेर काढले.

दरवाजा तोडताना आत आणखी काही लोक अडकलेत अशी चर्चा ऐकू आली. मागच्या दाराने मी आत गेलो पण तोवर बांबूंच्या जाळीवरील प्लास्टीकचे आच्छादन पेटून खाली कोसळलेले होते. आत जाणे शक्यच नव्हते. मुख्य दरवाजापाशी सर्वाधिक आग होती, अशी माहिती महेशने तो प्रसंग आठवून सांगितले.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …