Breaking News
Home / ठळक बातम्या / VIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे

VIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे

पिसीएमसी न्यूज – ‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

‘या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये?’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘या इमारतीतील हॉटेल अनधिकृतपणे सुरु होतं. तेव्हा यांना परवानगी दिली कुणी?’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

‘या घटनेला जबाबदार कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे… जोपर्यंत तुमच्या आडनावाला ठाकरे लागलेलं नाही तोपर्यंत, मुंबईकरांच्या आयुष्याला काहीही किंमत नाही. या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये? म्हणजे यामध्ये तुमच्या आडनावावर तुमचं आयुष्य वाचवलं जातं, ठाकरे आडनावामुळे महाबळेश्वर आणि लोणावळामधील हॉटेलवर कारवाई केली जाते. पण कमला मिलमधील या रेस्टॉरंटला दोन ते तीन महिन्याआधीच नोटीस देण्यात आली. पण तरीही ते सुरुच होतं. या हॉटेलकडे फक्त खाण्याचं लायसन्स होतं. मग याला कुणी हुक्का चालू करण्याची परवानगी दिली?’

काय आहे प्रकरण ?

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …