Breaking News
Home / ठळक बातम्या / VIDEO : पुणे सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राडा, टोलनाका पाडला बंद

VIDEO : पुणे सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राडा, टोलनाका पाडला बंद

पिसीएमसी न्यूज – सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सोलापुर – पुणे राष्ट्रीय महामार्गा वरिल टोल नका बंद पाडण्यात आला आहे.

महामार्गावरिल अपघाती झालेल्या कुंटुंबाला प्रत्येकि 10 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, टोल कंपनीच्या हलगर्जी पणामुळे 12 जणाचा मृत्यु झाला आहे तरी टोल संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा , टोल नाक्यावर फक्त भूमिपुत्राणा नोकरी मिळावी , मोहोळ शहरासाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड करून द्यावा अशा विविध मागण्यांसाठी मोहोळ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आज सोलापुर – पुणे राष्ट्रीय महामार्गा वरिल सावलेश्र्वर टोक  नका वसूली बंद पाडण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू अशा इशारा यावेळी देण्यात आलाय . या आंदोलनात मोहोळ नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्ह्या परिषद सदस्य उमेश पाटिल यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …