Breaking News
Home / मनोरंजन / आमिर खानला मिळाली परवानगी ! आता बनवणार स्वप्नातले घर !!

आमिर खानला मिळाली परवानगी ! आता बनवणार स्वप्नातले घर !!

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली आहे.

मुंबईच्या पाली हिल्स भागातील मरीना बिल्डिंगमधील चार वेगवेगळे फ्लॅट एका जिन्याने जोडण्याचे काम आमिर खानने सुरू केले होते. पण आमिरच्या एका शेजाऱ्याने याबाबत महापालिकेत तक्रार दाखल केली होती. या फ्लॅटमध्ये आमिरला अनेक बदल करायचे होते. पण शेजा-याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने या बांधकामावर स्थगिती आणली होती. यानंतर आमिरचा आर्किटेक्चर अमित सप्रेने आयआयटी बॉम्बेने दिलेले पत्र मुंबई महापालिकेत जमा केले. या नव्या बांधकामामुळे इमारतीच्या सुरक्षेला कुठलाही धोका नाही, अशा आशयाच्या या पत्रानंतर आमिरला आपले ड्रिम हाऊस साकारण्याची परवानगी मिळाली.

मरीना बिल्डिंगमध्ये आमिरचे चार फ्लॅट आहेत. तळमजल्यात़, पहिल्या माळ्यावर दोन आणि चौथ्या माळ्यावर एक़. या चारही फ्लॅटला एका जीनाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्याची आमिरची इच्छा आहे. आमिरचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यात आमिरसह अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Check Also

अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित

पिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला …

3 comments

  1. Like!! Thank you for publishing this awesome article.

  2. Perfectly composed articles , thankyou for information. 🙂

  3. Perfect update of captcha recognition software “XEvil 4.0”:
    captcha solving of Google (ReCaptcha-2 and ReCaptcha-3), Facebook, BitFinex, Bing, Hotmail, SolveMedia, Yandex,
    and more than 8400 another size-types of captchas,
    with highest precision (80..100%) and highest speed (100 img per second).
    You can use XEvil 4.0 with any most popular SEO/SMM programms: iMacros, XRumer, GSA SER, ZennoPoster, Srapebox, Senuke, and more than 100 of other software.

    Interested? There are a lot of demo videos about XEvil in YouTube.

    FREE DEMO AVAILABLE!

    See you later!

Leave a Reply

Your email address will not be published.