Breaking News
Home / ठळक बातम्या / जाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी
तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतरही जनतेला अपार दु:ख झाले होते. त्यानंतर आता करुणानिधी यांच्या निधनानंतरही हीच अवस्था आहे.

जाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी

चेन्नई : मंगळवारी सायंकाळी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी तब्बल पाच वेळा विराजमान झाले…. तर १३ वेळ ते विधानसभेवर निवडून आले. आपल्या आयुष्यात त्यांना कधीही राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं नाही… अशा वेळी करुणानिधी यांच्या संपत्तीकडेही अनेकांचं लक्ष आहे.

एम करुणानिधी यांनी २०१६ साली शेवटची निवडणूक थिरुवरूर विधानसभा मतदारसंघातून लढली होती. सलग दुसऱ्यांदा ते या जागेवरून निवडून आलेत. त्यांनी या निवडणुकीत आर पन्नीरसेल्वम यांना पछाडलं होतं. ‘एडीआर’च्या अहवालानुसार या निवडणुकीत त्यांनी तब्बल १५ लाख ५७ हजार ६८० रुपयांचा खर्च केला होता. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी त्यांना निवडणुकीच्या खर्चासाठी केवळ १९,१२,८८० रुपये देण्यात आले होते.

एम करुणानिधी यांनी तीन विवाह केले होते. त्यांनी आपल्या तीनही पत्नींच्या नावाने सर्वात जास्त संपत्ती गोळा केली होती. एकेकाळी ते दक्षिण भारतातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैंकी एक होते. उल्लेखनीय म्हणजे, डीएमके नेते करुणानिधी यांच्या नावावर ना घर, ना गाडी… किंवा त्यांच्या नावावर एखादी जमीनही नाही… परंतु, २०१६ मध्ये सादर केलेल्या घोषणापत्रानुसार, त्यांची आणि पत्नींची एकूण संपत्ती होती ६२ कोटी, ८३ लाख, ३३ हजार २५३ रुपये… यातील चल संपत्ती ५८ लाख ६१ हजार २५३ रुपये तर स्थायी संपत्ती ४ कोटी २२ लाख ३३ हजार रुपये इतकी होती. करुणानिधी यांच्या एका बँक अकाऊंटमध्ये १३ करोड ३१ लाख ७९ हजार ४५६ रुपये होते… २०१६ च्या निवडणुकीनंतर आलेल्या एडीआर अहवालात या आकड्याचा उल्लेख करण्यात आलाय.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

Leave a Reply

Your email address will not be published.