Breaking News
Home / ठळक बातम्या / करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार !

करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार !

चेन्नई : एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला. कोर्टाने तामिळनाडू सरकार आणि डीएमकेच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून, अखेर करुणानिधींच्या समाधीला मरीना बीचवर जागा देण्याचे आदेश दिले.

करुणानिधी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह देशभरातील दिग्गज नेते चेन्नईत पोहोचत आहेत.

अंत्यसंस्काराच्या जागेवरुन वाद

दरम्यान, करुणानिधी यांच्या पार्थिवावर नेमके कुठे अंत्यसंस्कार होणार, याबाबत वाद सुरु होता. राज्य सरकारने मरीना बीचवर अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे डीएमकेच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

करुणानिधी यांच्या समाधीसाठी तामिळनाडू सरकारने दुसरी जागा देण्याचं जाहीर केलं आहे. मात्र डीएमकेने मरीना बीचचीच मागणी केली.

त्यामुळे याबाबत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. रात्री याबाबत सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकारने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे कोर्टाने आज सकाळी आठची वेळ दिली.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

2 comments

  1. Have you ever wanted to learn how to buy and sell Bitcoin? There sure is a lot of money to be made trading it. What if there was an easy to follow method that could earn you money? There is. All it takes is following these simple steps. This system is so simple, even a chimpanzee could do it! Follow the link and see for yourself just how easy profiting from Bitcoin can be https://t.grtyv.com/4oye9wkgw0?aff_id=29696&offer_id=5182&nopop=1

  2. I believe you have mentioned some very interesting points, regards for the post. 🙂

Leave a Reply

Your email address will not be published.