Breaking News
Home / ठळक बातम्या / सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं

सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं

मुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं.

सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावलं. मल्टिप्लेक्स ही खासगी मालमत्ता आहे, तिथे काही नियम बनवण्याचा त्यांना अधिकार आहे, असा युक्तिवाद मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून करण्यात आला.

घरच्या पौष्टिक जेवणाची बाहेरील जंकफूडशी तुलना होऊ शकत नाही. सिनेमा दाखवणे तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, अशा शब्दात हायकोर्टाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावलं.

सिनेमा पाहताना अनेकदा लहान मुलं असतात, सकस अन्नाऐवजी तुम्ही त्यांना जंक फूड देता, असं मतही हायकोर्टाने व्यक्त केलं.

दरम्यान, यासाठी कुणीही कायदा हातात घेण्याची गरज नाही, कुणी कायदा मोडत असेल तर त्यासाठी पोलीस आहेत, कोर्ट आहे, असं म्हणत हायकोर्टाने मनसेच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तूर्तास हायकोर्टाकडून कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

One comment

  1. Have you ever wanted to learn how to buy and sell Bitcoin? There sure is a lot of money to be made trading it. What if there was an easy to follow method that could earn you money? There is. All it takes is following these simple steps. This system is so simple, even a chimpanzee could do it! Follow the link and see for yourself just how easy profiting from Bitcoin can be https://t.grtyv.com/4oye9wkgw0?aff_id=29696&offer_id=5182&nopop=1

Leave a Reply

Your email address will not be published.