Breaking News
Home / ठळक बातम्या / बैलाच्या तेराव्याला चक्क आमदारासह ५००० लोकांची हजेरी

बैलाच्या तेराव्याला चक्क आमदारासह ५००० लोकांची हजेरी

मुजफ्फरनगर : एखाद्या प्राण्याचा लळा लागला तर त्यासाठी आपण काहीही करू शकतो. अशीच घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. मुजफ्फरनगरमध्ये बैलाच्या तेराव्याला चक्क ५००० पेक्षा आधिक लोकांनी हजेरी लावली आहे. बैलाप्रती असेलेल्या प्रेमापोटी स्थानिक आमदारासह ५००० लोकांनी हजेरी लावली आहे.

गावातील लोक या बैलाला नंदी आणि भोला मानत होते. विजेचा धक्का लागल्यामुळे २४ जुलै रोजी बैलाचा मृत्यू झाला. मुजफ्फरनगरमधील उकावली गावांमध्ये रविवारी १३व्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘भोला सर्वांना प्रेम करत होता. त्याच्यासोबत सर्व लहानमुलेही खेळत होते. गावातील प्रत्येक घरी जाऊन तो खात असे’, असे स्थानिक ग्रामस्थ जनार्धन त्यागी यांनी सांगितले.

दुसरे एक स्थानिक मनोज त्यागी म्हणाले की,  ‘नंदी आणि गावकऱ्यांमध्ये एक वेगळेच कनेक्शन होते. त्याच्या मृत्यूने सर्वांना दुख झाले आहे. नंदीच्या तेराव्यासाठी गावातील प्रत्येक घराने आर्थिक मदत केली. तेराव्यासाठी दीड लाख रूपये खर्च झाला.’ अन्य एका ग्रामस्थाने सांगितले की, ‘नंदीच्या तीन वर्षाच्या बछड्याला आता पगडी घातली असून आजपासून गावातील नंदीची तो जागा घेईल. ‘

या आयोजनामध्ये सहभागी झालेलले बुढानाचे आमदार अमेश मालिक यांनी याबद्दल दुख व्यक्त केले. ‘गावातील व्यक्तींचे प्राण्याबद्दलचे प्रेम पाहून मला आनंद झाला, गावातील लोकांनी सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणे नंदीचे अंतिम संस्कार केले.’ असे मालिक म्हणाले

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

Leave a Reply

Your email address will not be published.