Breaking News
Home / ठळक बातम्या / VIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु

VIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई : किकी चॅलेंजचे जीवघेणे वेडं दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ ३० जुलै रोजी यु ट्यूबवर डाउनलोड करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. चालत्या लोकलमध्ये असं चॅलेंज करणं धोक्याचं असून ते कोणीही करू नये असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी सांगितले. मुंबईकरांनी कुठल्याही ट्रेंडला बळी पडून आपला जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन त्यांनी केले आहे.

आतापर्यंत शेकडे युजर्सनी हा ट्रेंड फॉलो केला असून, तितके व्हिडिओही सोशल साईट्सवर पोस्ट केले आहेत. हा ट्रेंड फॉलो करणे धोकादायक आहे. या ट्रेंडची लोकप्रियता पाहून दुबई पोलिसांनी किकी डान्स करण्याबाबत धोक्याचा इशाराही दिला आहे. हा डान्स अमेरिका, यूरोप, इजिप्त, जॉर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंड होत आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही उघड झाले आहे. नुकतेच मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून किकी चॅलेंज पाहून चालत्या वाहनाबाहेर किकी चॅलेंज करू नये असे आवाहन केले होते.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

Leave a Reply

Your email address will not be published.